भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३२ वा जयंती उत्सव मा. अधिष्ठाता डॉ. डिंपल पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई येथे साजरा करण्यात आला. या उत्सवामध्ये नेत्र तपासणी शिबिर, व्याख्यान, निबंध स्पर्धा, रांगोळी व चित्रकला स्पर्धा इ. कार्यक्रमांचा समावेश होता. सदर उत्सवात महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर वृंदाने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला त्याची काही क्षणचित्रे.